॥ प्रथम तुला वंदितो कृपाडा लिरिक्स ॥
प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया...
विघ्न विनाशक गुणिजन पालक, दुरित तिमिर हारका
सुख कारक तू दुःख विदारक, तूच तुझा सारखा
वक्रतुंड ब्रम्हांड नायका,विनायका प्रभुराया
प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया...
सिद्धि विनायक तूच अनंता, शिवात्मजा मंगला
सिन्दुर वदना विद्याधिशा,गणाधिपा वत्सला
तूच ईश्वरा साह्य करावे, हा भवसिन्धु तरया
प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया...
गज वदना तव रूप मनोहर, शुक्लाम्बर शिव सुता
चिंतामणि तू अष्टविनायक, सकलांचि देवता
रिद्धिसिद्धि चा वरा दयाडा, देई कृपे ची छाया
प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया...
टिप्पणियाँ